Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वीज दरवाढ निश्चित!

वीज दरवाढ निश्चित!


मुंबई :  महावितरणने १ एप्रिलपासून वीज दरांमध्ये ३७ 'टक्क्यांची मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कंपनीला सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात अदानी पॉवर आणि जीएमआर, वरोरा यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. न्यायालयाने महावितरणला हजारो कोटींचा दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनी वीज दरात आणखी वाढ करून या दंडाची भरपाई ग्राहकांकडूनच करील. त्यामुळे या उन्हाळ्यात वीज दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

अदानी पॉवर कंपनीचा तिरोडा येथे ३३०० मेगावॅटचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातूनच महावितरणला विजेचा पुरवठा केला जातो. कोळसा कंपनी आवश्यक कोळसा देऊ न शकल्याने अदानीला कोळसा आयात करावा लागला. या कोळशाची किंमत बरीच मोठी आहे. अदानीला यासाठी महावितरणला अतिरिक्त किंमत देण्यास सांगितले. मात्र, कंपनीने नकार दिला. हे प्रकरण महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग व लवादाकडून होत सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. मात्र, प्रत्येक ठिकाणी महावितरणला पराभवाचा सामना करावा लागला. वरोरा येथे वीज संयंत्राचे संचालन करणाऱ्या जीएमआर कंपनीसोबतही हीच नामुष्की ओढवली आहे.

दोन्ही प्रकरणे कोळसा आयात धोरणात २००७ आणि २०१३ मध्ये झालेल्या नियमातील बदलामुळे झाली आहेत. या काळात देशातील कोळशाची प्रचंड टंचाई होती. यामुळे ऊर्जा क्षेत्रात संशोधित नियमांची घोषणा करण्यात आली. महावितरणने अदानी पॉवरची देणी असलेल्या १० हजार कोटी रुपयांची वसुली आधीच ग्राहकांकडून केली आहे. आता ग्राहकांना पुन्हा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. हे शुल्क ग्राहकांकडून इंधन समायोजन शुल्काच्या नावाने वसूल केले जाईल. त्यामुळे महावितरण अदानी व जीएमआरला दिल्या जाणाऱ्या पैशांचा हिशोब करण्यात गुंतले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.