बेकायदा बांधकाम जमिनदोस्त करा माजी आमदार नितीन शिंदे
सांगली: साखर कारखानासमोरील लक्ष्मीनगरमधील दडगे प्लॉट येथे प्रार्थनास्थळाचे बेकायदा बांधकाम सुरू आहे. याबाबत स्थानिक नारीकांनी सकल हिंदू समाजाकडे तक्रार केली. याबाबत महापालिकेच्या आयुक्तांना पत्रव्यवहारही करण्यात आला. परंतू त्याठिकाणी कोणतीही कारवाई झालेली नाही. सदरचे बेकायदा बांधकाम तातडीने जमिनदोस्त करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह सकल हिंदू समाजातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आला. यावेळी सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी, लक्ष्मीनगरमधील स्थानिक नागरीक उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कुपवाडच्या मंगलमूर्ती कॉलनीतील आरक्षणाच्या जागेवरील तीन गुंठ्यांतील प्रार्थनास्थळाचे अतिक्रमण महापालिका प्रशासनाने हटविले. त्यानंतर आता दडगे प्लॉटमधील बेकायदा बांधकामाविषयी सकल हिंदू समाजातर्फे आक्रमक भूमिका घेण्यात आली.श्री. शिंदे म्हणाले,‘‘ दडगे प्लॉटमधील सर्व्हे क्रामांक १६२/४ अ, ब, क, ड येथे प्रार्थनास्थळाचे बांधकाम सुरू आहे. परंतू ही जागा रस्त्यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे याठिकाणी बेकायदा बांधकाम सुरू आहे. याबाबत स्थानिक नागरीकांनी विरोध केला, परंतू त्यांन धमकवण्याचे प्रकारही घडले. त्यानंतर त्यांनी सकल हिंदू समाजकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर सखोल माहिती घेतली असता हे बेकायदा बांधकाम सुरू असल्याचे समोर आले. त्यानंतर १२ जानेवारी रोजी आयुक्तांना याबाबत निवदनही देण्यात आले. परंतू अद्याप त्याठिकाणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर याच परिसरातील मंगलमुर्ती कॉलनीतील अतिक्रमण हटवण्यात आले. आता इथलेही बेकायदा बांधकाम थांबवण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. कारवाई न झाल्याने आक्रमक भूमिका आम्ही घेवू.’’ते म्हणाले,‘‘कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाला आमचा विरोध नाही. परंतू बेकायदेशीररित्या ज्याठिकाणी अशी प्रार्थनास्थळे आहे, त्यांच्यावर कारवाईसाठी आमची आग्रही भूमिका राहिल. ते कोणत्याही समाजाचे असतो. लवकरच पालकमंत्र्यांना याबाबत निवेदन देणार आहोत. मारूती रस्ता परिसरातही अशाच पद्धतीने जमीनदोस्त केलेले बांधकाम पुन्हा करण्यात आले आहे. त्याच्याही कारवाईची मागणी आम्ही करणार आहोत.’’
दडगे प्लॉटलमधील स्थानिक नागरीक रामचंद्र कोष्टी, श्रीकांत कोष्टी यांनी त्याठिकाणी होत असलेल्या अन्याय पत्रकारांसमोर सांगितला. काही गुंडांसह पोलिसही दमबाजी करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी अविनाश मोहिते, अभिमन्यू भोसले, आकाश जाधव, प्रकाश निकम, भूषण गुरव, संजय जाधव, बाळासाहेब बेलवलकर, रवींद्र वादवणे, राकेश कलगुडगी, किरण बेलवलकर, आशिष साळुंके, शुभम खोत यांच्यासह सकल हिंदू समाज सांगलीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.