Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंत्रालयात दलाली करणाऱ्या शेखर भोयर आणि दिलीप खोडे यांना २५ लाखांची लाच घेतांना अटक...

मंत्रालयात दलाली करणाऱ्या शेखर भोयर आणि दिलीप खोडे यांना २५ लाखांची लाच घेतांना अटक...


अमरावती : मंत्रालयात दलाली करणाऱ्या अमरावती येथील दोघांना 25 लाखांची लाच घेतांना नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. श्री. दिलीप वामनराव खोडे वय 50 वर्ष, पद – टेक्नीशियन एमआयडीसी, अमरावती.,शेखर भोयर, रा. अमरावती. असे कारवाई करण्यात आलेल्या दलालांची नावे असून आरोपी यांनी तक्रारदार यांचे विरूद्ध त्यांचे कार्यालयातील महिला अधीकारी यांनी दिलेल्या दोन तक्रारी मध्ये चौकशी थांबविणे साठी प्रत्येकी ५०,००,०००/- असे ऐकून 1 कोटी रुपयाची मागणी केली.

यातील तक्रारदार यांचे विरुद्ध आमदार मा. श्री.वजाहत मिर्झा , विधान परीषद म. राज्य यांचे कडे तक्रारदार यांचे विभागातील महिला अधीकारी यांनी केलेल्या तक्रारीमध्ये विधानपरिषद म.राज्य मध्ये प्रश्न उपस्थित न करणे व तक्रारीवर कोणतीही कारवाई न होता परस्पर मिटविण्याकरिता दिनांक 28/03/2023 आरोपी यांनी दोन केसेस चे प्रत्येकी 50,00,000/- असे ऐकून 1 कोटी रुपयांची मागणी केली. दिनांक 28/03/2023 रोजी आलोसे यांनी तक्रारदारास तडजोडी अंती 25,00,000/- रु.ची लाच रक्कम मागणी करून आरोपी क्र.१ यांनी पंचासमक्ष स्वीकारल्याने रंगेहात पकडण्यात आले. आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल....

मार्गदर्शन :- मा.श्री. राहुल माकणीकर सर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर,

मा.श्री मधुकर गिते सर, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र

सापळा व तपासी अधिकारी :- श्री. सचिन वा. मत्ते . पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. नागपूर.

सापळा कार्यवाही पथक:- श्री. सचिन वा. मत्ते . पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. नागपूर.

श्री. निलेश उरकुडे, पोलिस निरीक्षक, श्रीमती प्रीती शेंडे, पोलिस निरीक्षक, नापोशी सुशील यादव, पंकज घोडके,पो.शी. हरीश गांजरे , बादल मांढरे, सूरज भोंगाडे चालक विनोद नायगमकर सर्व ला. प्र. वी.नागपूर


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.