Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दवाखान्यातून दिवसा रोकड चोरणाऱ्यास अटक सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई..

दवाखान्यातून दिवसा रोकड चोरणाऱ्यास अटक  सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई..


सांगली: तुंग (ता. मिरज) येथील संजीवनी क्लिनिक येथून तीन लाख ३० हजारांची रोकड दिवसा लंपास करणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून चोरीतील दोन लाख 68 हजारांची रोकड, चोरीसाठी वापरलेले साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी दिली.  

रोहित बाजीराव आखळे (वय ३२, रा. केदारवाडी, ता. वाळवा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. तुंग येथील डॅ. अभिनंदन वाडकर यांच्या संजीवनी क्लिनिक येथून दि. १० माचर् रोजी तीन लाख तीस हजारांची रोकड चोरट्याने भरदिवसा लंपास केली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक डॅ. बसवराज तेली यांनी यातील चोरट्यांना शोधून त्यांना अटक करण्याचे आदेश सांगली ग्रामीण पोलिसांना दिले होते. त्यानुसार निरीक्षक गायकवाड यांनी एक खास पथक तयार केले होते. 
तुंग येथील दवाखान्यातील चोरी रोहित आखळे याने केल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर त्याला गुरुवारी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने तुंग येथील दवाखान्यातून रोकड चोरल्याची कबुली दिली. तसेच इस्लामपूर येथेही अशाच प्रकारची चोरी केल्याचीही त्याने कबुली दिली. त्याच्याकडून दोन्ही चोरीतील रोकड तसेच चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. रोहित आखळे हा पोलिसांच्या रेकॅडर्वरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली, सातारा, रायगड, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात २२ हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.   सांगली शहरचे उपअधीक्षक अजित टिके, सांगली ग्रामीणचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, उपनिरीक्षक किरण मगदूम, बाळकृष्ण गायकवाड, रमेश कोळी, संतोष माने, सचिन मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.