जयसिंगपूरच्या डॉ. शहा दांपत्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ला गवसणी
जयसिंगपूर : जयसिंगपूर येथील डॉ. भावेश भूपत शहा व डॉ. रेश्मा भावेश शहा यांनी लड़ाक येथील १४००० फुट उंचीवर २ डिग्री तापमानात गोठलेल्या पेंगोंग लेक वर आयोजित केलेल्या २१ कि.मी. अर्थ मॅराथॉन मध्ये सहभाग नोंदवून यशस्वीरित्या ही अर्धमॅराथॉन पूर्ण केली. या मॅराथॉनची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली. भारत चीन सीमेवर ७०० स्वे. कि.मी. अशा प्रशस्त हिमालयाच्या पर्वत राशीमध्ये पसरलेल्या पेंगोंग लेक वर ही मॅराथॉन २० फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. समुद्र सपाटीपासून १४००० फुट उंच या जगातील सर्वात उंच गोठलेल्या तलावावरील पहिली मॅराथॉन म्हणुन याची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद झाली.
सर्व सहभागी खेळाडूंसाठी सहा दिवस आधीपासून लेहमध्ये विविध अक्लीमटीयझेशन योजना आखल्या होत्या तसेच दोनदा विशेष मेडीकल चेकअपद्वारे स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. आव्हानात्मक निसर्ग परिस्थितीमुळे स्पर्धेच्या संपुर्ण मार्गावर मेडीकल सहाय्य ईमेजन्सी सहाय्य मोबाईल अॅम्ब्युलन्स, भारतीय सैन्य दल मदतीसाठी हजर होते. मॅराथॉनचा संपूर्ण मार्ग बर्फाच्या योग्य जाडीचा तपासणीनंतर आधोरेखीत केला होता.
ऑक्सिजनची कमतरता कडाक्याची थंडी, वारा, घसरडा बर्फ अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये केवळ नियमित व्यायाम प्राणायाम यांच्या जोडीने उदात्त मनोबलाने डॉ. शहा दांपत्याने ही मॅराथॉन पूर्ण केली. त्याबद्दल त्यांनी निसर्गाचे मनोमन आभार व्यक्त केले. या खडतर मॅराथॉनसाठी संपुर्ण देशातून ५० अनुभवी अॅथलिट्स ची निवड करण्यात आली होती. शहा दांपत्याचा हिमालय ट्रेकिंग व चादर ट्रेक मॅराथॉन सायकलिंग योगा या सर्वाचा अनुभव उपयोगी आला.
ग्लोबल वार्मिंग व वातावरणातील बदलामुळे वितळणाऱ्या बर्फा मुळे होणारे हिमालयाचे नुकसान व त्याचा जनमाणसावर होणारा विपरीत परिणाम याकडे संपुर्ण जगाचे लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने केंद्रशासन व लडाख मिनिस्ट्री यांच्या सहयोगाने एडव्हेंचर स्पोर्ट्स ऑफ लडाक फाऊंडेशनने या मॅराथॉनचे आयोजन केले होते. हिवाळयातील कडाक्याच्या थंडीमध्ये लडाकी लोकांना टूरीझम मधुन उपजिवीकेचे साधन मिळावे हे लक्षही या आयोजनामागे ठेवले होते.
या मॅराथॉनला लेह विकास कमिश्नर श्रीकांत सुसे. लेहचे चिफ एक्झीक्युटीव्ह कौन्सीलर तुलसी गॅलसन उपस्थित होते. प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषीके व सहभागी स्पर्धकांना सहभाग सर्टीफिकेट प्रदान करण्यात आली. आपला वैद्यकिय पेशा सक्षमपणे सांभाळत समाज जागृतीचे काम करीत असल्याबद्दल व ही जागृती मॅराथॉन यशस्वी पुर्ण केल्याबद्दल डॉ. भावेश शहा व डॉ. रेश्मा शहा दांपत्याचा सर्वत्र सत्कार व गौरव होत आहे. त्यांनी कुटूंब मित्र, स्थानिक लोक आयोजक यांचे मनापासून आभार मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.