गोव्यातील 'या' गावात आता बारवर बंदी..
गोवा: गोव्यातील 'या' गावात आता बारवर बंदी; यापुढे बारला परवानाही देणार नाही! ग्रामसभेतील निर्णयाची पत्रकार परिषदेत दिली. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्याचे मद्यविषयक धोरण वेगळे आहे. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात मद्याचे दर स्वस्त असतात. त्याचा लाभ येथे येणारे पर्यटक घेत असतात आणि त्यातून गोवा सरकारलाही मोठे उत्पन्न मिळत असते. पण आता गोव्यातील एका गावाने गावातील बारवर चक्क बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
गोव्याच्या युवतीची ब्रिटनमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने 'इतक्या' लाखांची फसवणूक उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील वारखंड या गावाने हा निर्णय घेतला आहे. वारखंडच्या सरपंच गौरी जोसालकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ग्रामसभेत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. वारखंड गावची अस्मिता राखण्यासाठी तसेच हे गाव आदर्श गाव म्हणून नावारूपाला आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.वारखंड पंचायत क्षेत्रात जीएमआरतर्फे जे बांधकाम सुरू आहे, त्यावरही आक्षेप घेऊन संबंधितांना निवेदन दिले आहे. ग्रामपंचायतीच्या महसुलाबाबतही आमदारांना निवेदन दिले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार याबाबतचा ठराव करण्यात आला. दरम्यान, पेडणे तालुक्यातील टॅक्सीचालकांचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. त्याबाबत पाठपुरावा केला जात आहे. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेडणेतील टॅक्सीचालकांना स्वतंत्र काऊंटर द्यावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. तसेच जीएमआरच्या प्रोजेक्टसाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळेल असे सरकारने सांगितले होते. पण अद्याप त्याची पुर्तता झालेली नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.