Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी नगरसेवक खून प्रकरण माजी नगरसेवक उमेश सावंतच सूत्रधार..

माजी नगरसेवक खून प्रकरण माजी नगरसेवक उमेश सावंतच सूत्रधार.. 



चौघांना अटक पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची माहिती 

सांगली: जत येथे शुक्रवारी भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांचा खूनप्रकरणाचा मुख्य सूत्रधार माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी तीन सराईत गुन्हेगारांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार उमेश सावंत पसार झाल्याने खुनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.  बबलू ऊफर् संदीप शंकर चव्हाण (वय २७, रा. समथर् कॅलनी, जत), निकेश ऊफर् दाद्या दिनकर मदने (वय २४, रा. मौजे डिग्रज, ता. मिरज), आकाश सुधाकर व्हनखंडे (वय २४, रा. सातारा फाटा, जत), किरण विठ्ठल चव्हाण (वय २७, रा. जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या खुनातील मुख्य सूत्रधार नगरसेवक उमेश सावंत पसार झाला आहे.  

शुक्रवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास जत-शेगाव रस्त्यावरील एका शाळेजवळ कारमधून निघालेल्या माजी नगरसेवक विजय ताड यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यानंतर ताड घराच्या दिशेने पळून जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ते खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्यात गोळी झाडून तसेच त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच अधीक्षक डॉ. तेली यांच्यासह एलसीबीच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एलसीबीसह स्थानिक पोलिस ठाण्याची पथके हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आली होती. 

या घटनेचा कसून तपास केल्यानंतर सराईत गुन्हेगार संदीप ऊफर् बबलू चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी हा खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे जतमध्ये ठाण मांडून होते. संशयित बबलू चव्हाण हा कनार्टकातील गोकाक येथे असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने गोकाक येथे छापा टाकून बबलू चव्हाणसह अन्य संशयितांना ताब्यात घेतेल. रविवारी रात्री उशीरा संशयितांकडे पोलिस अधीक्षक डॅ. तेली यांनी कसून चौकशी केली. त्यावेळी बबलू चव्हाण याने उमेश सावंत याच्या सांगण्यावरून हा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर सवर् संशयितांना अटक करण्यात आली. 

त्यानंतर या खुनाचा मुख्य सूत्रधार उमेश सावंत याच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली आहेत. लवकरच त्याला अटक करू असे अधीक्षक डॅ. तेली यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मागर्दशर्नाखाली एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, जतचे निरीक्षक राजेश रामाघरे, सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, सहायक निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक विशाल येळेकर, संदीप नलवडे, प्रकाश पाटील, चेतन महाजन, प्रशांत माळी, दीपक गायकवाड, कुबेर खोत, सचिन धोत्रे, जितेंद्र जाधव, आमसिद्धा खोत, संजय कांबळे, सोहेल कातिर्यानी, वैभव पाटील, उदय माळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान या गुन्ह्याचा अधिक तपास एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे करत आहेत. 

तिघेजण रेकॅडर्वरील गुन्हेगार

यातील तीन संशयित पोलिसांच्या रेकॅडर्वरील गुन्हेगार आहेत. बबलू चव्हाण याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर त्याच्यावर एमपीडीएअंतगर्त स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. निकेश मदने हाही सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, दरोडा, गंभीर दुखापत मारामारी असे चार गुन्हे दाखल आहेत. आकाश व्हनखंडे याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. 

संशयितांनी आठ दिवस केली होती रेकी 

ताड यांचा खून करण्यापूवीर् ताड यांनी आठ दिवस त्यांच्या हालचालीची रेकी केली होती. ताड यांच्या घराजवळ असलेल्या शाळेजवळ आठ दिवस ते रेकी करत होते. त्यावेळी शाळेच्या बस चालकाला त्याचा संशय आल्याने त्याने मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढले होते. पोलिसांच्या चौकशीत ते रेकॅडिंग पुढे आले. त्यामुळे हा खून बबलू चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली होती. खुनानंतर दोनच दिवसात हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.