Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विमानतळावर पकडलं दीड किलो सोनं..

विमानतळावर पकडलं दीड किलो सोनं..


कोची : एअर इंडियाच्या केबिन क्रूकडून तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. एअर इंडियाच्या केबिन क्रूला कोची विमानतळावर सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. शफी हा मूळचा वायनाडचा रहिवासी असून त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी कोची येथे 1 किलो 487 ग्रॅम सोन्यासह अटक केली. बहारीन-कोझिकोड-कोची सेवेचा केबिन क्रू मेंबर शफी हा सोने घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती सीमा शुल्क प्रतिबंधक आयुक्तालयाला मिळाली होती.

दरम्यान, उशीराने आलेल्या बातमीनुसार एअर इंडिया व्यवस्थापनाने सदर क्रू मेंबरला निलंबित केले आहे. शफीने सोन्याची तस्करी करण्याचा वेगळा मार्ग शोधून काढला होता, पण तो त्याचा प्लान अंमलात आणण्याआधीच पकडला गेला. आरोपी हातात सोने गुंडाळून शर्टाच्या बाहीला झाकून ग्रीन चॅनलमधून जाण्याचा कट आखत होता. त्याची अधिक चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, चेन्नई कस्टम्सने सांगितले की, सिंगापूरच्या दोन प्रवाशांना चेन्नई विमानतळावर 3.32 कोटी रुपयांचे 6.8 किलो सोने बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. एका ट्विटमध्ये चेन्नई कस्टम्सने म्हटले आहे की,”गुप्तचर माहितीच्या आधारे सिंगापूरहून चेन्नईला येत असलेल्या संशयित प्रवाशांच्या सामानाची झडती घेतली असता, 6.8 किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले. त्याची किंमत 3 कोटी 32 लाख रुपये आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.