Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एक लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त चौघांना अटक

एक लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त  चौघांना अटक 



इचलकरंजी :  इचलकरंजी येथील कबनूरमध्ये ऊरूसाच्या पाश्वर्भूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने छापा टाकून एक लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूरचे अधीक्षक रविंद्र आवळे यांनी दिली. 

अशोक देवाप्पा पिंपळे (रा. कबनूर), विशाल विजयकुमार विधानी, सतीश देवाप्पा पिंपळे, आकाश महादेव रायबागे (रा. विक्रमनगर, इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कबनूर येथे दोन दिवसांपासून उरूस सुरू आहे. त्या पाश्वर्भूमीवर त्या परिसरात अवैध दारू विक्री, साठा यावर कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त डॅ. बी. एच. तडवी यांनी दिले आहेत. त्यानुसार अधीक्षक आवळे यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते.   

कबनूर येथील एका वडा विक्रीच्या दुकानात देशी, विदेशी मद्यसाठा केल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर गुरुवारी पथकाने त्या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी तेथे देशी दारूच्या 996 बाटल्या, विदेशी दारूच्या 451 बाटल्या असा एक लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. 

विभागीय आयुक्त तडवी, अधीक्षक रविंद्र आवळे, उपअधीक्षक एल. आर. खोत यांच्या मागर्दशर्नाखाली निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक विजय नाईक, सागर नलवडे, अंकिता पाटील, वषार् पाटील, जय शिनगारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.