Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपच्या महिला नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

भाजपच्या महिला नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट


आपले वडील आपलं लैंगिक शोषण करत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट एका भाजप महिला नेत्याने केला आहे. ही नेता नुकतीच राष्ट्रीय महिला आयोगाची सदस्य बनली आहे. या महिला नेत्याचं नाव खुशबू सुंदर असं आहे. यापूर्वी खुशबू या अभिनेत्री म्हणून काम करत होत्या. खुशबू यांनी आपल्या वडिलांवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. 

एका माध्यमाशी बोलताना खुशबू म्हणाल्या की, मला वाटतं जेव्हा एका मुलासोबत अशा प्रकारे गैरवर्तन केलं जात, तेव्हा त्याचे गंभीर परिणाम मुलाला आयुष्यभर भोगावे लागतात. माझ्या आईचं वैवाहिक जीवन अत्यंत वाईट होतं. तिचं लग्न अशा माणसाशी झालं होतं ज्याला आपल्या बायकोला, मुलांना मारहाण करणं, एकुलत्या एका मुलीचं लैंगिक शोषण करणं म्हणजे त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असं वाटत होतं. माझं वयाच्या आठव्या वर्षापासून लैंगिक शोषण झालं आणि 15व्या वर्षी मी या विरोधात ब्र उच्चारू शकले, असं सुंदर यांचं म्हणणं आहे.

अखेर एक वेळ अशी आली की मला माझ्यासाठी उभं राहावं लागलं. पण एक भीती मला नेहमी सतवायची की माझी आई माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेल की नाही. कारण, ती पती म्हणजे परमेश्वर असतो असं मानणारी होती. पण मी 15व्या वर्षी या सगळ्याला विरोध करायला सुरुवात केली, असं खुशबू यांचं म्हणणं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.