Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारताच्या 'द एलिफंट विस्परर्स' ने पटकावला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार

भारताच्या 'द एलिफंट विस्परर्स' ने पटकावला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार


'ऑस्कर 2023'मध्ये भारताच्या 'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटाने बाजी मारली आहे. या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. 'द एलिफंट विस्परर्स' हा नेटफ्लिक्सवरचा एक माहितीपट आहे. या माहितीपटाला 'ऑस्कर 2023'मध्ये 'सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म' या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं. या माहितीपटात तामिळनाडूमधील मुदुमलाई व्याघ्न प्रकल्पातील एका कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. तामिळनाडूतील एक कुटुंब बेबंद हत्तींना दत्तक घेतं आणि त्यांचं कसं संगोपन करतं यावर बेतलेला हा माहितीपट आहे.

गुनीत मोगाने द एलिफंट विस्परर्स  या माहितीपटाची निर्मिती केली असून कार्तिकी गोन्साल्विसने या माहितीपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटासह 'हॉलआऊट', 'हाऊ डू यू मेजर अ इअर', 'द मार्था मिचेल इफेक्ट', 'स्ट्रेंजर ॲट द गेट' या माहितीपटांनादेखील 'ऑस्कर 2023'मध्ये 'सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्म' या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं. 'ऑस्कर' हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार पटकावणं हे जगातील जवळपास प्रत्येक सिनेकलाकाराचं स्वप्न असतं. अर्थात प्रत्येक कलाकाराचं हे स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. पण यंदा मात्र 'ऑस्कर' पुरस्कार सोहळ्या भारताचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

प्रियांका चोप्राकडून 'द एलिफंट विस्परर्स'चं कौतुक

'द एलिफंट विस्परर्स' या भारताच्या माहितीपटाला ऑस्कर 2023'साठी नामांकन मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने या माहितीपटाचं कौतुक केलं होतं. तिने लिहिलं होतं, "मी नुकताच एक हृदयस्पर्शी माहितीपट पाहिला. हा माहितीपट मला खूप आवडला आहे. कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा यांचे खूप खूप अभिनंदन".

ऑस्करच्या शर्यतीतून भारताची 'ऑल दॅट ब्रीथ्स' बाहेर

ऑस्करच्या शर्यतीतून भारताचा 'ऑल दॅट ब्रीथ्स' हा माहितीपट बाहेर पडला आहे. ऑस्कर पुरस्कार 'डॉक्युमेंटरी फीचर फिल्म' या श्रेणीत 'नैवेल्नी'ने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले. या श्रेणीत 'ऑल दॅट ब्रीथ्स'या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. मात्र, या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.