Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरज सिव्हीलचे कमर्चारी मध्यरात्रीपासून संपात सहभागी

मिरज सिव्हीलचे कमर्चारी मध्यरात्रीपासून संपात सहभागी


सांगली:  जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यभरातील शासकीय-निमशासकीय कमर्चारी आजपासून बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालच्या रूग्णालयातील नसेर्स सोमवारी मध्यरात्रीपासूनच या संपात सहभागी झाले आहेत. सोमवारी रात्री कतर्व्यावर असलेल्या नसेर्स, परिचारक यांच्यासह सवर् कमर्चाऱ्यांनी रात्री बारापासून संपात सहभाग नोंदवला. यामध्ये सुमारे ३५० कमर्चारी सहभागी झाल्याची माहिती महाराष्ट्र नसेर्स फेडरेशनच्या अध्यक्ष इंदूमती थोरात, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हशमत हवेरी यांच्या मागर्दशर्नाखाली सवर् कमर्चारी संपात सहभागी झाल्याचे संघटनेच्या मिरज शाखेच्या अध्यक्ष प्रतिभा हेटकाळे यांनी सांगितले.  

राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यांच्या धतीर्वर महाराष्ट्रातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी, कमर्चारी यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात राज्यातील ३५ हजारांहून अधिक कमर्चारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे आजपासून शासकीय कायार्लये सुरू असली तरी कमर्चारी संपावर गेल्याने शासकीय कायार्लयांचे काम ठप्प होणार आहे. 

मिरजेतील शासकीय रूग्णालयात नसेर्स संघटनेने रात्री बारा वाजल्यापासून संप सुरू केला आहे. रात्री संघटनेच्या अध्यक्ष प्रतिभा हेटकाळे यांच्या नेतृत्वाखाली रूग्णालयातील रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या कमर्चाऱ्यांनी प्रवेशद्वारावर जोरदार निदशर्ने करत घोषणाबाजी केली. दरम्यान सांगलीतील सिव्हील हॅस्पिटलमधील कमर्चारीही या संपात सहभागी झाले आहेत. मंगळवारी सकाळपासून त्यांनी सांगलीतील रूग्णालयासमोर घोषणाबाजी करत निदशर्ने केली. 

मिरजेतील संपात नसेर्स असोसिएशनच्या अध्यक्ष प्रतिभा हेटकाळे, उपाध्यक्ष वरूण सत्याचारी, सचिव विवेक कुरणे, सहसचिव सारिका घव्हाळी, कायार्ध्यक्ष मेघा कदम, जितेंद्र आरसूड, कोषाध्यक्ष प्राची वाघमारे, सह कोषाध्याक्ष आशिष ओंबासे, संघटक विशाल सावडेर्कर, सॅमसन दारूवाला, हमीद मुल्ला, संतोष कांबळे आदी सहभागी झाले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.