हजारो कोटीचा घोटाळा करणारा नीरव मोदी कंगाल
कधीकाळी अब्जावधीची दौलत आणि भारतातील श्रीमंतांपैकी एक असलेल्या नीरव मोदीच्या खात्यात केवळ २३६ रुपये उरले आहेत. एका रिपोर्टमधून हा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. तसेच नीरव मोदीकडे न्यायालयीन खर्च करण्यासाठीची रक्कमही उरलेली नाही.
हजारो कोटींचं कर्ज घेऊन ते बुडवल्यानंतर नीरव मोदी परदेशात पळाला होता. एका वृत्तानुसार नीरव मोदी पुरता कंगाल झाला आहे. श्रीमंतीत लोळणाऱ्या नीरव मोदीच्या एका कंपनीच्या खात्यामध्ये आता केवळ २३६ रुपये उरले आहेत. नीरव मोदीची कंपनी फायरस्टार डायमंड प्रायव्हेट लिमिटेडच्या बँक खात्यामधून कोटक महिंद्रा बँकेने इन्कम टॅक्सची थकित रक्कम ट्रान्सफर केली आहे.
कंपनीच्या खात्यामधून २.४६ कोटी रुपये एसबीआयच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आल्यानंतर या कंपनीच्या खात्यामध्ये केवळ २३६ रुपये उरले आहेत. मात्र जी रक्कम कोटक महिंद्रा बँकेने ट्रान्सफर केली आहे, ती यूनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या एकूण थकित रकमेचा केवळ एक भाग आहे.नीरव मोदीच्या वाईट दिवसांची सुरुवात २०१९ पासून झाली होती. तेव्हा पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहूल चोकसी यांच्यावर बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने १३ हजार ५०० कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर दोघांचा तपास हा ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात आला. तसेच १९ मार्च २०१९ रोजी त्याला होलबोर्न येथून अटक करण्यात आली. नीरव मोदी कंगालीच्या मार्गावर पोहोचला असून. खात्यात मोजकीच रक्कम शिल्लक राहिल्याने आता न्यायालयीन खर्च भागवण्यासाठीही त्याच्याकडे पैसे उरलेले नाहीत. आता उदार उसनवार करून तो आपले खर्च भागवत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.