Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नघरात झाला सिलेंडर स्फोट..

लग्नघरात झाला सिलेंडर स्फोट..


मध्य प्रदेशात काळीज पिळवटणारी घटना घडली आहे. लग्नाच्या विधी सुरु असताना घरातील सिलेंडरचा स्फोट होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नवरदेवाच्या आईसह काकी, वहिनी आणि दोन बहिणींचा समावेश आहे. त्यामुळे लग्नघरात शोककळा पसरली असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मध्य प्रदेशातील भिंडे जिल्ह्यातील गोरमी गावात राहणाऱ्या रिंकू यादवचे 20 फेब्रुवारीला लग्न होते. लग्नाच्या विधी सुरु होत्या. कुटुंबासह नातेवाईक , ग्रामस्थ या लग्नाला उपस्थित होते. त्यावेळी तिथेच सगळ्यांसाठी जेवण सुरु होते. या दरम्यान लहान सिलेंडर आणून त्यावर जेवण बनवले जात होते. मात्र अचानक सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यात रिंकू यादवची आई जलदेवी, वहिनी नीरु, काकी पिंकी आणि अनिता-सुनिता या दोन विवाहीत बहिणींचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासह 12 जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेनंतर एकच खळबळ माजली. तत्काळ जखमींना रुग्णावलयात नेण्यात आले. गंभीर अवस्थेत 8 जणांना ग्वाल्हेर येथे नेण्यास सांगितले. मात्र नवरदेवाची आई, काकी, वहिनीसह दोन बहिणींची गंभीर अवस्था असल्याने त्यांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करायला सांगितले. तेव्हापासून या पाच महिलांचा एम्स रुग्णालयात उपचार सुरु होता. उपचारा दरम्यान पाचही जणींचा मृत्यू झाला. गावात त्यांच्या मृत्यूच्या बातमीने शोककळा पसरली आहे. बुधवारी सकाळी मृतदेह गावाला आणण्यात आले. रिंकूच्या घराबाहेर पाच मृतदेह पाहिल्यावर साऱ्यांनाच अश्रू अनावर झाले. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.