Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मासिक पाळीचं रक्त विकण्याचा प्रकार भयंकर...; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

मासिक पाळीचं रक्त विकण्याचा प्रकार भयंकर...; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया


विज्ञानाच्या युगात जादुटोण्यासाठी सुनेच्या मासिक पाळीचं रक्त विकणं हा अघोरी आणि भयंकर प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत विधिमंडळाबाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. बीडमधील घडलेल्या या किळसवाण्य़ा प्रकारासंदर्भात पुण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यावर अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, "सासरच्या लोकांनी एका महिलेला मासिक पाळीच्या वेळी हातपाय बांधून अत्यंत विचित्र प्रकार केला. ते सार्वजनिकपणे बोलावंही वाटत नाही. विज्ञान युग असताना समाजात भयंकर अंधश्रद्धा वाढत चालली आहे. अंधश्रद्धेमुळे समाजात अशा भयानक गोष्टी घडत आहेत. या प्रकरणी मी पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यानंतर ही घटना पुणे ग्रामीणमधील असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांशी बोललो. आरोपींविरोधात जेवढी कडक कलमं लावता येतील तेवढी कडक कलमं लावा, असा आदेश दिला आहे.असा आघोरी प्रकार करत असताना भीती का वाटत नाही किंवा कायद्याची तरी भीती वाटली पाहिजे."

काय आहे प्रकरण?

बीडमधील विवाहित महिलेचं मासिक पाळीतील रक्त सासरच्या मंडळींनी विकल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. 27 वर्षीय पीडित महिलेने या प्रकरणी तिच्या माहेरी म्हणजे पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पती, सासू, सासरे, दीर, मावस दीर आणि आणखी एका व्यक्तीवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार 2019 पासून सुरु होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय पीडित महिला ही पुण्यातील विश्रांतवाडी भागात राहायला आहे. दोन वर्षांपूर्वी पीडित महिला आणि तिच्या पतीचा प्रेमविवाह झाला होता. यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक छळ करायला सुरुवात केली. अघोरी विद्येच्या नादात सासरच्या मंडळींनी पीडित महिलेच्या मासिक पाळी दरम्यान तिचे हातपाय बांधून तिचे मासिक पाळीचे रक्त कापसाने काढत ते भरुन 50 हजार रुपयांना जादूटोण्यासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. घडलेली घटना या पीडित महिलेने तिच्या आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.