वैद्यकिय रजा आणि गोव्यात मजा..
छत्तीसगडमध्ये गुरूर विकास गटातील दोन शिक्षक वैद्यकिय रजा घेवून गोव्यात ट्रीप साठी गेले होते. त्यांचे गोव्यातील फोटो प्रसिद्ध झाले त्यानंतर ते फोटो गट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले.
दरम्यान, या शिक्षकांबाबत आणखी एक प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत जिल्हा शिक्षणाधिकारी मुकेश साहू यांनी या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनहरन लाल सिन्हा आणि तिभू राम गंगबर अशी या शिक्षकांची नावे आहेत. शिक्षक मनहरन लाल सिन्हा हायस्कूल कणेरी आणि तिभू राम गंगबर हे ठेकवा शाळेचे शिक्षक आहेत. गोव्यात जाण्यासह त्याच्यावर कर्तव्याच्या काळात जमीन खरेदी-विक्रीचाही आरोप करण्यात आला आहे.दोन्ही शिक्षक जमीन खरेदी-विक्रीचे काम करतात. अशी तक्रार आल्यानंतर गुरुर विकास गटाचे शिक्षणाधिकारी ललित चंद्राकर यांनी सांगितले. विभागीय माहितीशिवाय सरकारी कर्मचारी असे काम करू शकत नाहीत, असे ते म्हणाले. तसेच, वैद्यकीय रजा लागू करून गोव्याला जाण्याचे प्रकरण समोर येत आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.