Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॉलेज बाहेर ये तुला सोडणार नाही..

कॉलेज बाहेर ये तुला सोडणार नाही...





अमरावती : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे, तिचा विनयभंग करणे, छेड काढणे, अपहरण करून बलात्कार करणे,ग्रामीण असो वा शहर दिवसाकाठी चार ते पाच घटनांमध्ये एफआयआर नोंदविला जातो. अनेकांना जन्मठेप व सक्तमजुरीची शिक्षा देखील सुनावली जाते. मात्र, तरीदेखील अशा संतापजनक प्रकारांमध्ये घट झालेली नाही. शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याच्या घटनेची शाई वाळते न वाळतेच एका कॉलेजकन्येला बलात्काराची धमकी देण्यात आली. त्यामुळे समाजमन हादरले आहे.

याप्रकरणी, चांदुररेल्वे पोलिसांनी १३ मार्च रोजी रात्री ९.२७ च्या सुमारास आरोपी कुणाल गजानन वानखडे (२१, कळमगाव, ता. चांदूररेल्वे) या माथेफिरूविरूध्द विनयभंग व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला. १३ मार्च रोजी दुपारी १२ ते १२.१० च्या सुमारास चांदूररेल्वे शहरात ही घटना घडली. १७ वर्षे पाच महिने वयाची विद्यार्थीनी सोमवारी दुपारी २ च्या सुमारास बारावीचा पेपर देण्याकरीता परिक्षा केंद्राकडे जात होती. तेवढ्यात आरोपी दुचाकीस्वार कुणालने तिला कट मारला. तथा तिचा विनयभंग केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने तू कॉलेजच्या बाहेर ये, तुला सोडणार नाही, मारून टाकतो, अशी गर्भित धमकी दिली. त्या धमकीमुळे सैरभैर झालेल्या त्या विद्यार्थीनीने कसाबसा पेपर दिला. अगदी घाईने घर गाठले. सारा प्रकार पालकांच्या कानी घातला. रात्रीच्या सुमारास तिेने चांदूर रेल्वे पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न

अन्य एका घटनेत एका ४५ वर्षीय महिलेला विवस्त्र करण्याचा संतापजनक प्रकार चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरात घडला. १२ मार्च रोजी रात्री ती महिला स्वत:च्या शेतात पाणी व्यवस्थापनाचे काम करीत होती. तेवढयात आरोपी भालचंद्र देशमुख (४५) हा तेथे पोहोचला. तू पाण्याचे काम करू नकोस, असे म्हणून त्याने तिला शिविगाळ केली. तथा विनय अशा घटनांमध्ये अलिकडे वाढ झाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.