बेकायदेशीर लॅब चालकांवर कारवाई होणार..
सांगली : सांगली जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील अवैध लॅबोरेटरी चालकांवर महाराष्ट्र वैद्यक व्यावसायिक अधिनियम १९६१ च्या कलम ३३ नुसार सुरू केलेली कारवाई काहींच्या आदेशाने रोखली होती. रोखलेली कारवाई सुरू करावी व अवैध लॅबोरेटरी बंद कराव्यात, यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत चौगुले हे जिल्हाधिकारी यांचे कार्यालयासमोर उपोषणास बसले होते.
जिल्हा प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली व जिल्हा बोगस डॉक्टर शोध समितीचे सदस्य जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील अंबोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेच्या संदर्भाने जिल्ह्यातील सर्व लॅबचे सर्वेक्षण करून अवैध लॅब चालकांवर कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर थांबविले. लेखी उपोषण समितीचे सदस्य सचिव पोलिस उपधीक्षक अरविंद बोडके यांनीही सबंधित पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.