Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शाहरुख खानची पत्नी गौरी खान विरोधात तक्रार दाखल..

शाहरुख खानची पत्नी गौरी खान विरोधात तक्रार दाखल..



मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. यामुळे शाहरुख खानचे कुटुंब पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहे. एका फ्लॅट संदर्भातील खरेदी विक्री प्रकरणी गौरी खानसह अन्य दोघांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतील जसवंत शहा नावाच्या व्यक्तीने पोलिसात तक्रार दिली आहे.

गौरी खान यांच्या विरोधात सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व भागातील रहिवासी शाह यांनी ही तक्रार केली आहे.कंपनीने वेळेवर फ्लॅटचा ताबा दिला नाही, असा आरोप आहे. गौरी खान या कंपनीच्या ब्रँड अँबेसिटर असल्याचा दावा करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रादार यांच्यानुसार शाहरुख खानची पत्नी गौरी खान लखनौस्थित तुसियानी कंपनीचे प्रमोशन करताना दिसल्या होत्या. तुलसियानी कंपनी शहीद पथावर असलेल्या सुशल गोल्फ सिटी परिसरात गोल्फ व्ह्यू नावाची टाऊनशिप विकसित करत असल्याचे सांगण्यात आले. गौरी खान यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्हही आरोपींविरोधात कलम 409 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नाव आल्यानंतर गौरी खान यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.