Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

“उद्धव ठाकरेंची कुंडली सांगते की, २०२५ आधीच…”

“उद्धव ठाकरेंची कुंडली सांगते की, २०२५ आधीच…”


सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू असल्याने राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. एकीकडे या सुनावणीवर सर्वांचे लक्ष्य लागून आहे तर दुसरीकडे सोमवारपासून राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा सुरु झाले आहे. या अधिवेशनावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात नेहमीप्रमाणेच वाद, आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. या एकूणच तप्त वातावरणाचा केंद्रबिंदू म्हणजेच ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट हा वाद कधी निवळणार याची महाराष्ट्रातील सामान्य जनता वाट पाहतेय. अशातच आता उद्धव ठाकरे व जुन्या शिवसेनेच्या समर्थकांसाठी काहीसा दिलासा देणारी ग्रह स्थिती येत्या काळात तयार होत असल्याचे ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत येत्या काळात बदलाचे संकेत आहेत, नेमकी या बदलाची सुरुवात कधी होणार व या काळात काय काय बदलू शकते याचा घेतलेला हा मागोवा..

उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत काय बदलणार?

कृष्णपक्षातील षष्ठी ते शुक्ल पक्षातील दशमीपर्यंत चंद्रबळ क्षीण असते, तसेच हा चंद्र सिंहराशीत व्यय स्थानात बसला आहे. त्याबरोबर राहू व प्लुटो युती करत आहेत. एकूण ग्रहांची ही स्थिती मानसिक त्रासात भर घालणारी आहे. पण चतुर्थातील स्वगृहीच्या गुरूचे पाठबळ खूपसा दिलासा देईल. त्यातून परिश्रम, मेहनत यातून यशाचा मार्ग दिसू लागेल. विशेष म्हणजे गुरू महादशेत भाग्यातील मंगळाची महादशा खूपशी मानसिक स्थिरता देईल.

उद्धव ठाकरेंसाठी शुभ काळ..

उद्धव ठाकरेंच्या कुंडलीतील बदल आश्वासक असले तरी त्याआधी पुढील दोन वर्ष त्यांना अपार कष्ट घ्यावे लागतील असे दिसत आहे. कारण त्यांचा शुभ काळ हा २५ जून २०२५ ते १ जून २०२६ या कालावधीत असणार आहे. आतापासून मोर्चेबांधणी सुरु केल्यास त्यांना या काळात नवे विचार, नवीन प्रेरणा, नवीन दिशा सापडेल आणि त्यातून संघटनेला वेगळे बळ नक्कीच प्राप्त होईल.

दरम्यान, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेगटाला दिले आणि पक्षाचे शिवसेना हे नावसुद्धा देऊन टाकले असताना आयुष्यभर उरापोटाशी जपलेला पक्ष ठाकरे यांच्यापासून दूर झाला. उद्धव ठाकरे पोरके झाले पण खरा बाणेदार माणूस रडत बसत नाही, तो लढतो हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले. आता यापुढे भाग्य जरी जोरावर असेल तरी ठाकरेंना सुद्धा वादविवाद टाळावे लागतील आणि नवीन दौऱ्यांतून, नव्या पिढीचे कार्यकर्ते शोधा ते विश्वासू सापडतील, असे त्यांची पत्रिका सांगते आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.