Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील पहिली तृतीय पंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात; 3 जणांनी दिली मैदानी चाचणी

राज्यातील पहिली तृतीय पंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात; 3 जणांनी दिली मैदानी चाचणी


सातारा: महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारच्यावतीने पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी हजारो तरुण-तरुणींनी अर्ज देखील केले आहेत. विशेष म्हणजे प्रथमच तृतीयपंथीयांना पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. या भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी देखील अर्ज केले आहेत. यानुसार साताऱ्यात तृतीयपंथीयांची आज पहिली पोलीस भरती पार पडली असून यामध्ये आर्या पुजारी, भूषण शिंदे आणि सतीश पाटील यांची मैदानी चाचणी घेण्यात आली.


सातारा जिल्ह्यात पार पडत असलेल्या पोलीस भरतीसाठी तृतीयपंथीयांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानुरास तीन तृतीय पंथीयांची मैदानी चाचणी घेण्यात आली. साताऱ्याच्या आर्या पुजारी यांनी पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांसाठी जागा उपलब्ध करावी यासाठी न्यायालयीन लढा दिला होता. त्याला यश मिळाले आहे. साताऱ्यात या तीन जणांच्या भरतीसाठी 70 हून अधिक पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

100 मीटर, 800 मीटर धावणे, गोळा फेक अशी मैदानी चाचणी संबंधित तीन तृतीय पंथीय उमेदवारांची घेण्यात आली आली. या मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.