Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

3 वर्षीय लेकीच्या खोलीतून येत होता घाणेरडा वास...

3 वर्षीय लेकीच्या खोलीतून येत होता घाणेरडा वास...


लंडन, 14 मार्च : 3 वर्षांची चिमुकली सतत आजारी पडत होती. तिच्या खोलीतून घाणेरडा वासही येत होता. काही केल्या ही दुर्गंधी काही जात नव्हती. या घाणेरड्या वासाचं आणि लेकीच्या आजारपणाचं कारण आईलाही समजत नव्हतं.

अखेर एक दिवस तिला तिच्या बेडखाली असं काही दिसलं जे पाहून तिच्या अंगावर काटाच आला. तिची लेक खरंतर मृत्यूसोबतच झोपत होती. लंडनच्या हॅकनीमध्ये राहणारी टेर्री हर्रीग डिसेंबर 2019 साली ती आपल्या कुटुंबास नव्या घरात शिफ्ट झाली. त्यावेळी घराला नवा रंग देण्यात आला होता. त्यानंतर तिची 3 वर्षांची मुलगी एरिला सतत आजारी असायची. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. ती घराबाहेरही जायची नाही. तरी तिची तब्येत बिघडत होती, ती आजारी का आणि कशी याबाबत टेर्री चिंतेत होती.

तिच्या खोलीतून खूप दुर्गंधी येत होती. कितीही साफसफाई केली तरी दुर्गंधी काही कमी होत नव्हती. नेमका हा घाणेरडा वास येतोय तरी कुठून हे तिलाही समजत नव्हतं. अखेर तिने आपल्या मुलीच्या बेडखाली पाहिलं तेव्हा तिला धक्काच बसला. तिच्या मुलीच्या आजारपणाचं आणि तिच्या खोलीतून येणाऱ्या दुर्गंधीचं कारण हे तिच्या बेडखालीच दडलं होतं. जेव्हा बेडच्या मागे तिने पाहिलं तेव्हा ती हादरली. टेर्री म्हणाली, जेव्हा तिने आपल्या मुलीचा बेड हटवून पाहिला तेव्हा तिच्या अंगावर काटाच आला. जर काही वेळ तिची मुलगी अशा खोलीत राहिली असती तर तिचा जीव गेला असता.

एरिलाच्या खोलीतील बेडवर दुसरं तिसरं काही नाही तर फंगस होतं. हे फंगस घराच्या भिंतीपासून किचन, टॉयलेट, सीलिंग आणि कपाटातील कपड्यांवरही पसरलं होतं. ज्याच्याकडून टेर्रीने घर खरेदी केलं त्याने खोलीतील फंगस हटवण्याऐवजी त्यावर फक्त रंग मारला होता. त्यामुळे तिला सत्य समजलं नाही. या फंगसमुळेच तिच्या मुलीची तब्येत खराब होत होती.

टेर्रीने पाण्याने फंगस हटवण्याचा प्रयत्न केला. पण एक आठवड्यांनी ते पुन्हा वाढत होतं. तिने आपल्या कुटुंबाचे सर्व पैसे हे घर खरेदीसाठी लावले होते. त्यामुळे ती दुसऱ्या नव्या घरातही शिफ्ट होऊ शकत नव्हती. टेर्रीने आपली ही स्टोरी लोकांना सांगून सर्वांना जागरूक केलं आहे. घर खरेदी करण्यापूर्वी एकदा भिंती जरूर तपासा असा सल्ला तिने दिला आहे. तिच्या या घराचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.