स्व पद्मभूषण डॉ वसंतराव दादा पाटील यांच्या 34 व्यां पुण्यातिथी निर्मित विनम्र अभिवादन....
दादा आपल्यातून जाऊन आज मितीला चौतीस वर्ष पुर्ण झाली आहेत तरी आजा सुधा सांगली च्या विकासाचा विचार आला तरी दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही कोणताही माणूस सहज म्हणून जातो दादा गेल्यानंतर म्हानावे असे काहीही विकास काम अथवा मोठा उद्योग आणि कार्य घडलेले नाही ही किती मोठी शोकांतिका आहे. काहीच घडले नाही असे म्हणणे काही अर्थी चुकीचे असेल ही रस्ते गटारी म्हणजे सर्वांगीण विकास म्हणता येणार नाही हे काही राष्ट्रीय महामार्ग आपल्या जिल्ह्यातून गेले आहेत ते जिल्ह्यातील नेतृत्व मुळे जाहले आहेत असे म्हणणे चुकीचे होईल
दादाची दूरदृष्टी पहिली तर लक्ष्यात येईल सांगली सिव्हील व मिरज हॉस्पिटल ची जागा अजून पन्नास वर्षे पुरेल इतकी जागा संपादित करून ठेवली आहे तसेच सांगली जिल्हा पोलिस मुख्यालय जागा मध्यवर्ती ठिकाण,सांगली जिल्हा परिषद ची व सांगली सिव्हील हॉस्पिटल देखणी इमारत,इतर पाणी पुरवठा योजना असतील त्याकाळात त्यांनी कवलापूर विमानतळ विकसित करण्यासाठी केलेला प्रयत्न त्यांच्या नंतर आजतागायत तसाच पडून राहिला आहे सांगली जिल्हा मध्ये ड्रायपोर्ट सुधा होऊ शकला नाही
नुसते भाषणात सांगली जिल्ह्यात वसंतराव दादा चे नाव घेतल्या शिवाय सुरवात होत नाही मात्र तेवढेच नाव घेऊन झाले की त्यांच्ये कर्तुत्व व आदर्श घेताना कोणीही दिसत नाही असो दादा तुम्ही परत जन्माला यावे पुनश्च एकदा विनम्र अभिवादन........
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.