Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एच3एन2 विषाणूमुळे भारतात दोघांचा मृत्यू..

एच3एन2 विषाणूमुळे भारतात दोघांचा मृत्यू..


नवी दिल्ली: देशात कोरोनानंतर प्रथमच एच3एन2 या विषाणूची दहशत बघायला मिळत आहे.भारतात या विषाणूमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरात 90 रुग्णांच्या संख्येची नोंद करण्यात आली आहे. हरियाणा आणि कर्नाटकमध्ये इन्फ्लूएंझा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी या प्रकरणी सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. आत्ता अजूनही इन्फ्लुएन्झाबाबत भीतीचे वातावरण नाही. मात्र गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, काळजी घ्या, मास्क लावा असे सल्ले डॉक्टरांकडून दिले जात आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून राजधानी दिल्लीसह भारतातील अनेक भागात इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना महामारीनंतर लोकांमध्ये फ्लूचे रुग्ण वाढण्याची भीती आहे, कारण कोरोना सारखीच लक्षणे त्रस्त रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांत दिल्ली आणि आसपासच्या भागातून असे अनेक रुग्ण रुग्णालयात पोहोचले आहेत, ज्यांना गेल्या 10-12 दिवसांपासून तीव्र तापासह खोकला येत आहे. आयएमएच्या म्हणण्यानुसार काही काही रूग्ण असेही आहेत ज्यांचा ताप तीन दिवसांमध्ये जातो आहे. मात्र सर्दी आणि खोकला तीन आठवड्यांमध्येही जात नाही. प्रदूषणामुळेही 15 पेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वयस्कर लोकांमध्ये सर्दी-खोकला आणि ताप येण्याचे प्रमाण वाढले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.