24 मार्च पर्यंत वृत्तवाहिनीच्या घोटाळे बाज पत्रकाराला पोलीस कोठडी सुनावली..
शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणूक करा मोठया प्रमाणावर परतावा मिळवून देतो अशी फसवणूक करणारा वृत्तवाहिनी पत्रकार संशयित आरोपी रवींद्र शिवाजी कांबळे रा. मिरज यास मंगळवारी सांगली न्यायालयात विश्रामबाग पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे संशयित आरोपी 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत राहणार.
या फसवणूक प्रकरणात यापुर्वी चार जणांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी सुनिल शिवाजी माळी (वय ४२, लिंगनूर, ता. मिरज) यांनी फिर्याद दिली आहे. दोन वर्षांपूर्वी कॉलीटॉस अॅग्रो व ड्रिम मल्टिट्रेड सर्व्हिसेस कंपनीमध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला दहा ते वीस टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले होते. त्यामध्ये सुनील शिवाजी माळी यांच्यासह व्यंकटरमन ओबलेस मसराज (रा. वान्लेसवाडी), नितीन गजानन कोंगनोळीकर (वसंतनगर), शौकत अब्दुलकलाम नायकवडी (रा. सांगली) या चौघांनी ५० लाख ४९ हजार रुपयाची गुंतवणूक केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.