Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मेडिक्लेमसाठी 24 तास रुग्णालयात दाखल होणं आवश्यक नाही..

मेडिक्लेमसाठी 24 तास रुग्णालयात दाखल होणं आवश्यक नाही..


मेडिकल इन्शुरन्स क्लेमसंबंधी एक महत्त्वाचा निर्णय बडोद्याच्या ग्राहक मंचाने दिला आहे. एखाद्या व्यक्तिला मेडिक्लेम कव्हर मिळण्यासाठी 24 तास रुग्णालयात दाखल होणं गरजेचं नाही, असं मंचाने स्पष्ट केलं आहे. त्यासोबत विमा कंपनीला मेडिक्लेमची रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत.

बडोद्याचे रहिवासी असलेल्या रमेश चंद्र जोशी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ग्राहक मंचासमोर सुनावणी झाली. जोशी यांनी 2017मध्ये नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विरुद्ध तक्रार दाखल केली होती. कंपनीने त्यांना विमा क्लेम दिला नव्हता. जोशी यांच्या पत्नी 2016मध्ये डर्मेटोमायोसिटिसने आजारी होत्या. त्यांना अहमदाबाद लाईफ केअर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळाला.

जोशी यांनी कंपनीकडे 44,468 रुपयांचा क्लेम दाखल केला. पण, त्यांचा क्लेम रद्द करण्यात आला. पॉलिसीच्या नियमांनुसार 24 तास रुग्णालयात दाखल करणं गरजेचं आहे. पण जोशी यांनी 24 तास पूर्ण केलं नव्हते. त्यामुळे त्यांचा क्लेम रद्द करण्यात आला. पण, जोशी यांनी त्यांना 24 तास दाखल करण्यात आल्याचे पुरावे दिले होते. पण तरीही त्यांचा क्लेम रद्द करण्यात आला.

अखेर जोशी यांनी याविरुद्ध याचिका दाखल केली. त्या याचिकेवर सुनावणी करताना मंच म्हणाला की, जरी एखादा रुग्ण 24 तासांपेक्षा कमी वेळासाठी रुग्णालयात दाखल असेल, तरीही त्याला क्लेम मिळायला हवा. आधुनिक जगात नवीन तंत्रज्ञानामुळे डॉक्टर कमी वेळात इलाज करतात. त्याआधी उपचारांना वेळ लागत होता. आता तर किती तरी वेळा रुग्णालयात दाखल न होताच उपचार केला जातो. त्यामुळे विमा कंपनीला क्लेमची रक्कम द्यावी लागेल असे आदेश मंचाने कंपनीला दिले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.