अजित पवार यांच्यासोबतच्या सत्तास्थापनेचे पूर्ण सत्य बाहेर आणणार - देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या सोबतच्या सत्ता स्थापनेचे संपूर्ण सत्य समोर आणण्याची एक प्रकारे चेतावणीच दिली आहे. ते गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये सकाळीच अचानक शपथविधी घेऊन सरकार स्थापन केले. हे सरकार एका दिवसांतच बरखास्त झाले. परंतु, त्याचे परिणाम आणि चर्चा अजूनही पाहायला मिळत आहेत.
आता याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आपले छुपे पत्ते हळूहळू उघडायला सुरुवात केली आहे. त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हंटले, की सत्ता स्थापनेचे सर्व तपशील हळूहळू प्रकट होतील आणि तुम्हाला सर्व सत्य समजेल. पुढे ते म्हणाले, की सध्या ज्या गोष्टी सार्वजनिक आहेत, ते अर्ध सत्य आहे. मी सर्व तपशील बाहेर आणेन. मी काही बोललो, की समोरून त्यावर आणखी खुलासा येतो. अशा प्रकारे मी सर्व गुपित सर्वांसमोर आणणार आहे.
या आधीच बुधवारी शरद पवार यांनी मान्य केले, की राष्ट्रपती राजवट मोडून काढण्यासाठीच फडणवीस-पवार युतीचे सरकार स्थापन केले होते. त्याशिवाय तातडीने उद्धव ठाकरे मुखमंत्री झाले नव्हते. परंतु, गुरुवारी यावर फडणवीस यांनी केलेल्या विधानाने नेमके काय सत्य समोर येणार आहे? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.