प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती अंतर्गत शिष्यवृत्तीचे प्रदान करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्यांची खाती अद्ययावत करणे आवश्यक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत
सांगली दि. 22 : समाज कल्याण विभागाकडील प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती अंतर्गत शिष्यवृत्तीचे प्रदान करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्यांची खाती अद्ययावत करणे आवश्यक आहे. अद्ययावत करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्याबाबतची माहिती मुख्याध्यापकांच्या शिफारशीसह संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनी दि. 3 मार्च 2023 अखेर जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद सांगलीकडे जमा करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांनी केले आहे.
समाजकल्याण विभागाकडील योजना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इ. 5 वी ते 7 वी, गुणवत्ता शिष्यवृत्ती इ. 5 वी ते 10 वी आणि परीक्षा फी यातील वि.जा.भ.ज. व वि.मा.प्र. संवर्गातील सन 2016-17 पासूनच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वर्ग करावयाची आहे. सन 2016-17 ते 2020-21 अखेरच्या सदर योजनांमधील माहिती सादर केलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे खाते अद्ययावत करून घ्यावे. जर पूर्वीचे खाते बंद झाले असेल तर नवीन खाते तपशील शाळांकडील मुख्याध्यापकांमार्फत सादर करावे, असे आवाहनही श्री. कामत यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.