कॅब बुकींगच्या आमिषाने सव्वा लाखांचा गंडा..
पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी मयुर मोहन निकम (रा. पंचशीलनगर, मोरया अपार्टमेंट, जुना बुधगाव रोड सांगली ) हे एका खाजगी कंपनीत कामास आहेत. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांचे आई-वडिल कल्याणहून सांगलीस येणार होते. त्याकरिता ऑनलाइन कॅब बुकींग करण्यासाठी ते इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेत होते. त्यावेळी एका अनोळखी क्रमांकावरुन त्यांना मोबाईलला एक लिंक पाठविण्यात आली. यानंतर लगेचच त्यांना मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधून पाठविलेल्या लिंकवरुन जर कॅब बुकींग केल्यास पन्नास टक्के सवलत मिळेल, असे आमिष दाखविले.
फिर्यादी मयुर निकम यांनी लिंक उघडून पैसे जातात की नाही पाहण्यासाठी प्रथम १०१ रुपये पाठविले. परंतु ती रक्कम स्विकारली न गेल्याने त्यांनी अनोळखी क्रमांकाला फोन करुन पैसे ट्रान्सफर होत नसल्याचे सांगितले. यानंतर त्यांना आणखी एक लिंक पाठवून त्यावर जॉईन होण्यास सांगण्यात आले. तेथे जॉईन झाल्यावर फिर्यादीच्या क्रेडिट कार्डची सर्व माहिती परस्पर घेतली गेली. आणि क्षणात त्यांच्या कार्डवरुन १ लाख २० हजार ६४० रुपये अनोळखी खात्यात वर्ग केले गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून फिर्याद दाखल केली. पोलिस अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.