ट्रकचे टायर फाटले, तीन बसेवर ट्रक आदळला, १५ जणांचा मृत्यू
भोपाळ : मध्य प्रदेशात मोठा अपघात झाला आहे. रीवा आणि सतना जिल्ह्यांच्या सीमेवर शुक्रवारी एका सिमेंटच्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन बसेसला धडक दिली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला. तसेच 50 जण जखमी झाले आहे. त्यातील 10 जणांची प्रकृती गंभीर आहे.
बरखडा गावाजवळील बोगद्याच्या बाहेर शुक्रवारी रात्री हा अपघात झाला आहे. बसमधील प्रवासी सतना शहरातील ‘कोल महाकुंभ’ मधून परतत होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची चौकशी केली. जखमींना सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.