Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली‘पिनॉमिक व्हेंचर शेअर मार्केट फसवणूक प्रकरण..

सांगली‘पिनॉमिक व्हेंचर शेअर मार्केट फसवणूक प्रकरण..


सांगली, ता. १९: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दीडपट रक्कम परतावा म्हणून देण्याचे आमिषाने कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या पिनॉमिक व्हेंचर अँड एलएलपी कंपनीच्या तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने आज रात्री उशीरा ताब्यात घेतले. पंकज पाटील, अभिजीत जाधव, संतोष घोडके अशी त्या तिघांची नावे असून विपूल प्रकाश पाटील याच्यासह दोघे अद्याप पसार आहेत. दरम्यान, आणखी दोन कोटी ८४ लाख ५० हजारांची फसवणूक झाल्याची आणखी एक फिर्याद शहर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी दिली.  

पिनॉमिक व्हेंचर अँड एलएलपीसह विविध कंपन्यांत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीनंतर दहा महिन्यांत दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्या आमिषाने माध्यमातून सांगलीसह अन्य जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते. यात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. सुमारे बावीस कोटींचा तक्रारी दाखल करण्यात आल्या. कोट्यवधींची फसवणूकीचा गुन्हा दाखल होताच संशयित पसार झाले होते. इतक्या मोठ्या रकमेचा घोटाळा असल्याने हा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास होता.

दरम्यान, सांगलीतील व्यापाऱ्याने जुलै ते नोव्हेंबर २०२१मध्ये तब्बल दोन कोटी ८४ लाख ५० हजारांची रक्कम गुंतवली होती. गुंतवलेल्या रक्कमेपोटी दहा महिन्यानंतर दीडपट रक्कम देण्याचे सांगितले होते. टीडीएस नको असल्यास रोखीने पैसे दिले जातील, असेही संशयितांनी सांगितले. मात्र, परताना देण्यास टाळाटाळ झाल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले. 

त्यानंतर आज आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंद केला. कोट्यवधीचा घोटाळा असून पिनॉमिक व्हेंचर अँड एलएलपीच्या माध्यमातून फसवणूक झालेल्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, कंपनीच्या तिघांना आज रात्री उशीरा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना उद्या न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. विपुल पाटील याच्यासह दोघे पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. कारवाईत सहायक निरीक्षक वाघ यांच्यासह अंमलदार अमोल लोहार, दीपक रणखंबे, विनोद कदम, उदय घाडगे, दीपाली पाटील यांचा सहभाग होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.