अभिनेता रामचरणने केली कॅन्सरग्रस्त मुलाची इच्छा पूर्ण..
मुंबई : अनेकदा साऊथ स्टार आपल्या अभिनयासोबत त्यांच्या दिलदार स्वभावासाठी देखील ओळखले जातात. अभिनेता रामचरण हे त्यातीलच एक नाव. मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा असूनही रामचरण नेहमी साधा आणि ग्राउंड टूअर्थ असल्याचे पाहायला मिळते.
रामचरणच्या याच साधेपणाचा पुन्हा एकदा अनुभव पाहायला मिळाला आहे. यावेळी रामचरणने कॅन्सरशी लढा देणाऱ्या एका छोट्या मुलाची भेट घेऊन त्याची इच्छा पूर्ण केली आहे. या भेटीचे काही फोटो देखील अभिनेत्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये रामचरण आपल्या नऊ वर्षाच्या फॅनशी बोलताना दिसत आहेत. हा मुलगा कॅन्सरशी झुंज देत आहे. तो राम चरणचा मोठा फॅन आहे. रामचरणला भेटण्याची तीव्र इच्छा या मुलाने व्यक्त केली होती. रामचरणने रुग्णालयात जाऊन त्याची इच्छा पूर्ण केली. यावेळी अभिनेत्यानं या मुलासोबत क्वॉलिटी टाईमदेखील स्पेंड केला. रामचरणच्या या कृतीचे नेटकऱ्यांनी खूपच कौतुक केलय.
रामचरण हा सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता असून, त्याचा चाहता वर्ग देखील लाखोंच्या घरात आहे. रामचरण याचा ‘आर आर आर’ हा चित्रपट चांगलाच सुपरहिट झाला. रामचरणने त्यात साकारलेली भूमिका देखील सर्वांना खूप आवडली असून, या चित्रपटासाठी अभिनेत्याचं विशेष कौतुक देखील करण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.