Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विश्रामबागमधून लाखांचे दागिने लंपास

विश्रामबागमधून लाखांचे दागिने लंपास 


सांगली, ता. १६:  विश्रामबाग परिसरातील विकास चौकातील घरातील तिजोरीत ठेवलेले लाखांचे सोने-चांदीचे दागिने चोरट्याने लंपास करुन पोबारा केला. याबाबत निलेश आप्पासो माळी (रा. प्रफुल्ल अपार्टंमेंट, फ्लॉट क्र. १, विकास चौक) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

फिर्यादी निलेश माळी यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरट्याने आतमधील तिजोरीतील एक लाखांचे दागिने लंपास केले. यामध्ये ९५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ३ हजार रुपये किंमतीची चांदीची वाटी आणि रोख तीन हजार याचा समावेश आहे. चोरट्याने अर्धा तासाच्या कालावधीत डल्ला मारुन पलायन केला. चोरीचा प्रकार निदर्शनास येताच निलेश यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.