Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फडकेज् सहयोग क्लासेस मध्ये बक्षीस वितरण.....

फडकेज् सहयोग क्लासेस मध्ये बक्षीस वितरण..... 


इ. 10 वी शुभेच्छा समारंभ व इ.5 वी ते 10 वी विद्यार्थी बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नुकताच एस. टी. आय.परीक्षा उत्तीर्ण झालेले श्री सुनील हुलवान  व एम. आय. टी. कॉलेजमध्ये कार्यरत असणारे आ. शिरीष वाघमारे तसेच कोल्हापूर येथे जलसंधारण अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या राज्यलक्ष्मी वाघमारे उपस्थित होते. 


विद्यार्थ्यांनी मोबाईल व टीव्हीचा वापर मर्यादित करून वेळेचे नियोजन केल्यास कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवणे शक्य होईल असे असे प्रतिपादन शिरीष वाघमारे यांनी केले. क्लासचे संचालक श्री सूर्यकांत तवटे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी चित्रकला स्पर्धा, हस्तक्षार स्पर्धा व विविध क्रीडा स्पर्धा मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले. तनिष्का पाटील, तरन्नुम  मकानदार, धम्मदीप व्हनकटे या विद्यार्थ्यांनी व सतीश पाटील या  पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राची जाधव व तनिष्का पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कु. तनिष्का पाटील हिला आदर्श विद्यार्थीनी म्हणून गैरवण्यात आले. स्वागत मधुरा तवटे व आभार संदेश केंगार यांनी मानले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.