Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान

विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान..


मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून कसबा, चिंचवडच्या पोटनविडणुकांचा प्रचार करताना जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावती निवडणुका लागू शकतात, असं मोठं विधानही उद्धव ठाकरे यांनी केलं. यावेळी ते म्हणाले, माझा अंदाजआहे की विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागू शकते, कारण अपात्रेता जो काही विषय आहे, तो सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

त्यामुळे जर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आपात्र झाले तर राज्यात मध्यावधी लागेल. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळी त्यांनी कसबापेठ आणि पिंपरीमध्ये मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली असून भाजप खासदार गिरीश बापट यांना आजारी असतानाही प्रचारासाठी आणल्याच्या मुद्द्यावरुन सडकून टीका केली. भाजपने मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने टिळक कुटुबीयांना वापरून फेकून दिल्याची घणाघाती टीका केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.