Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसने 'हात' पुढे केला; एकत्र येऊया..

काँग्रेसने 'हात' पुढे केला; एकत्र येऊया..


द्रातील सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीविरोधी भूमिका सातत्याने घेतली जात आहे. जनविरोधी धोरण राबविणाऱ्या भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आम्ही समविचारी पक्षांसोबत एकत्र येण्यास तयार आहोत, असे सांगत कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधकांच्या एकजुटीसाठी हात पुढे केला आहे.

छत्तीसगढची राजधानी रायपूर येथे सुरू असलेल्या कॉँग्रेसच्या 85 व्या अधिवेशनात मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मार्गदर्शन करताना खरगे यांनी देशात संविधानिक आणि लोकशाही मूल्यांवर सतत आक्रमण सुरू आहे, चीनच्या सीमेवर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, जनता महागाईत होरपळून निघाली असून बेरोजगारी वाढत आहे, असे सांगत केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

देशातील सध्याच्या कठीण परिस्थितीत काँग्रेस हा एकमेक पक्ष आहे जो सक्षम आणि निर्णायक नेतृत्व देऊ शकतो. 2004 ते 2014 पर्यंत समविचारी पक्षांसोबत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने देशातील जनतेची सेवा केली. आम्ही पुन्हा एकदा लोकविरोधी आणि अलोकतांत्रिक भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांसोबत जुळवून घेण्यास तयार आहोत, असे खरगे म्हणाले.

कॉँग्रेसच्या घटना घटनेत बदल

कॉँग्रेसच्या प्रतिनिधी सभेत (एआयसीसी) आणि पक्ष संघटनेतील 50 टक्के पदे अनुसूचित जाती, आदिवासी, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांसाठी राखीव असतील. त्यातील 50 टक्के पदे 50 वर्षांखालील व्यक्तींकडे असतील. 1 जानेवारी 2025 पासून काँग्रेसमध्ये डिजिटल सदस्यत्व नोंदणी. सदस्य नोंदणी फॉर्ममध्ये थर्ड जेंडरसाठीचा कॉलम असेल. तसेच सदस्यत्वाची नोंदणी करताना आई आणि पत्नीचेही नावही अर्जामध्ये लिहिले जाणार आहे.

ब्लॉक, जिल्हा आणि राज्य पातळीवर जिथे जिथे काँग्रेसचे निवडून आलेले सदस्य आहेत ते सर्व कॉँग्रेसच्या प्रतिनिधी सभेचे सदस्य असतील. अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीमधील (एआयसीसी) सदस्यांची संख्या 1240 आहे. ती वाढवून 1653 करण्यात येईल.

मोदींनी केवळ मित्रांचे हित साधले

दिल्लीच्या सत्तेत बसलेल्या भाजपचा डीएनए 'गरीबविरोधी' असून ते या देशातील लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण त्यांनी देशातील प्रचलित परिस्थितीच्या विरोधात जनआंदोलन पुकारले आहे. स्वतःला प्रधानसेवक म्हणवून घेणाऱ्यांनी केवळ आपल्या मित्रांचे हित साधले, असे सांगत खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला.

सोनिया गांधी यांचे निवृत्तीचे संकेत

माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉइंट ठरलेल्या 'भारत जोडो यात्रे'ने झाला याचे मला जास्त समाधान आहे. काँग्रेसच्या 85 क्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना कॉँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले. 1998 साली मी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. 25 वर्षांत कॉँग्रेसने अनेकदा मोठे यश संपादन केले आहे आणि निराशाही आली. काँग्रेस आणि जनता यांच्यातील संवादाचा वारसा समृद्ध झाल्याचे सांगत सोनिया गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रेसाठी राहुल गांधी यांचे आभार मानले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 2004 आणि 2009 साली लोकसभा निवडणुकीत आपला विजय झाला. माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉइंट ठरलेल्या 'भारत जोडो यात्रे'ने झाला याचे मला जास्त समाधान आहे. यामुळे मी वैयक्तिकरीत्या समाधानी आहे, असे सोनिया म्हणाल्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.