'विवेक अग्निहोत्री नीच माणूस.' स्वरा भास्करची जीभ घसरली.
मुंबई : 'द काश्मीर फाइल्स' हा 2022 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. देशभरातून या चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. राजकीय पटलावर नेत्यांनी आपल्या भाषणात त्याचा अनेकदा उल्लेख केला, समाजमाध्यमांवर अनेक मते नोंदविण्यात आली.
अनेकांना चित्रपटाच्या तिकिटासाठी झगडावे लागले. मात्र, आता चित्रपट रिलीज होऊन जवळपास आठ महिन्यांनी पुन्हा एकदा 'द काश्मीर फाइल्स' चर्चेत आला आहे. याच कारण देखील तितकंच खास आहे. नुकतंच या चित्रपटाने दादासाहेब फाळके पुरस्कार जिंकला आहे.
दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांनी दादासाहेब पुरस्कार जिंकल्यानंतर अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं असून, पत्रकार मोहम्मद जुबेरनं मात्र त्यावर फॅक्ट चेक असे लिहलं आहे. त्यानंतर वेगळ्याच चर्चेला उधाण आले. मात्र, यावर आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनं देखील आपली प्रतिक्रया दिली असून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. स्वरानं अतिशय टोकाची प्रतिक्रिया दिल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
स्वरानं आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अग्निहोत्री हे नेहमीच ज्वलंतपणे प्रतिक्रिया देतात. एखाद्या मुस्लिमावर ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांचे आरोप काय आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ते केवळ याच हेतूनं आरोप करतात की ते मुस्लिम आहेत. यावरुन असे दिसून येते की, न्यू इंडियामध्ये अजुनही किती नीचपणा आहे हे पाहा..’ असे स्वरानं म्हटले आहे.
दरम्यान, आता स्वरानं अतिशय टोकाची प्रतिक्रिया दिली असून यावरून नवा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, दुसरीकडे अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्या या ट्विटला विवेक अग्निहोत्री काय? उत्तर देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.