सात राज्यांतील ७० हून अधिक ठिकाणी एनआयएचे छापे!
राष्ट्रीय तपास संस्थेने मंगळवारी सकाळी सात राज्यांतील ७० हून अधिक ठिकाणी छापे टाकले.गुंड आणि गुन्हेगारी सिंडिकेटशी संबंधित प्रकरणात हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.एनआयएने ज्या राज्यांमध्ये छापे टाकले त्यात पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.याशिवाय एजन्सीने दिल्ली आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशांमध्येही तपास सुरू केला आहे.
पंजाबमधे सर्वाधिक छापे
एनआयएचे पथक पंजाबमधील जास्तीत जास्त 30 ठिकाणी छापे टाकत असल्याचे सांगण्यात आले आहे.एनआयएचा हा छापा म्हणजे गुंडांच्या नेटवर्कवरील कारवाईची चौथी फेरी आहे.याआधीही एजन्सीने वेगवेगळ्या राज्यात छापे टाकले आहेत.याशिवाय एनआयएच्या पथकाने गुजरातमध्येही छापेमारी केली आहे.लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी कुलविंदरच्या गांधीधाम परिसरात हा छापा टाकण्यात आला आहे.कुलविंदरवर बिश्नोई टोळीच्या लोकांना आश्रय दिल्याचा आरोप आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलविंदरचे आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांशीही संबंध आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.