Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'लगान' फेम जावेद खान अमरोही यांचे निधन..

'लगान' फेम जावेद खान अमरोही यांचे निधन..


नवी दिल्ली : टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन झाले आहे. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अभिनय कारकिर्दीत 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले जावेद खान अमरोही यांना विशेषतः आमिर खानच्या 'लगान' चित्रपटातील राम सिंहच्या भूमिकेसाठी ओळखले गेले.

त्यांच्या निधनाने बाॅलिवडूवर शोककळा पसरली आहे. लगान’, ‘वन्स अपॉन अ टाइम’, ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘चक दे ​​इंडिया’ यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी काम केले होते. जावेद खान शेवटचे 2020 मध्ये ‘सडक 2’ चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात जावेद खानने पक्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटात आलिया भट्ट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. याशिवाय जावेद खान अमरोही अनेक टीव्ही शोमध्ये दिसले होते. यासोबतच जावेद हे आयपीटीए (इंडियन पीपल्स थिएटर्स असोसिएशन) चे सक्रिय सदस्यही होते.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून श्‍वसनाच्या विकाराने अंथरूणाला ते खिळून होते. सांताक्रूझ येथील सूर्या नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. सायंकाळी ओशिवरा येथे त्यांचा दफनविधी करण्यात आला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.