Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मीडियाचा आवाज दाबणे म्हणजे जनतेचाच आवाज दाबण्यासारखे - केजरीवाल

मीडियाचा आवाज दाबणे म्हणजे जनतेचाच आवाज दाबण्यासारखे - केजरीवाल


नवी दिल्ली: मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्याचा आवाज दाबणे हे जनतेचा आवाज दाबण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बीबीसीवरील आयकर छाप्याच्या संबंधात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. ते म्हणाले की, जो कोणी भाजपच्या विरोधात बोलतो, हे लोक त्याच्या मागे सीबीआय, ईडी आणि आयकराच्या यंत्रणा लावतात, असे केजरीवाल यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.

भाजपला देशातील लोकशाही व्यवस्था आणि संस्थांना चिरडून संपूर्ण देशाला आपले गुलाम बनवायचे आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. बीबीसीने पंतप्रधान मोदींच्या गुजरात दंगलीतील कथित सहभागाच्या संबंधात एक माहितीपट जारी केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बीबीसीवर ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांकडून केला जात आहे. तथापि, भाजपकडून मात्र याचा इन्कार करण्यात आला असून बीबीसी ही भ्रष्ट बकवास कार्पोरेशन बनली असल्याची प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.