Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मालकाने कोट्यवधींची संपत्ती केली कर्मचाऱ्यांना दान..

मालकाने कोट्यवधींची संपत्ती केली कर्मचाऱ्यांना दान..


तीस एकर जमिन, वाडा आणि आलिशान गाड्या अशी कोट्यवधींची संपत्ती एका मालकाने कर्मचाऱ्यांना दान केली आहे. त्यांच्या या दानशूरपणामुळे सोशल मीडियावर ते चर्चेचा विषय बनले आहेत. पंजाबमधील श्री अमृतसर साहिब येथील ही घटना आहे. बलजित सिंह असे त्या मालकाचे नाव असून ते 87 वर्षांचे आहेत. त्यांनी आपली तीस एकर जमीन, वाडा आणि आलिशान गाड्या त्यांच्या येथे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावावर केली आहे. बलजित सिंह यांना अपत्ये नाहीत. त्यांच्या बांम या गावी त्यांच्याकडे 30 एकर जमिन आहे. बलजित सिंह सांगतात की, 2011 मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. पत्नी हयात असताना दोघांनी निर्णय घेतला होता की, ते आपली संपत्ती कोणत्याही परिस्थितीत नातेवाईकांच्या हाती लागू देणार नाहीत.

बलजित सिंह यांनी सांगितले की, एकदा त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बठिंडा पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या इकबाल नावाच्या कर्मचाऱ्याच्या नावे 19 एकर जमिन केलीय. त्याशिवाय दोन अन्य कर्मचाऱ्यांच्या नावे सहा आणि चार एकर जमिन केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या नावावर रजिस्ट्रेशनही करण्यात आले आहे.

याबाबत कर्मचारी इकबाल सिंह याने सांगितले की, मी फार मेहनतीने काम केले आहे. ही जमीन मिळाल्याने मी खूप खुश आहे. इकबाल सांगतो की, बलजित सिंह यांनी त्यांचा वाडाही त्याला दिला आहे. बलजीत सिंह स्वत: शेतात असलेल्या दोन खोल्यांमध्ये राहत आहेत. बलजित सिंह यांच्या नातेवाईकांबाबत तो ,सांगतो तो व्यवहार पेट्रोल पंपाशी संबंधित आहे. जमिनीशी काही संबंध नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.