Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण..

सांगली पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण..



सांगली, ता. १७: जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणास दगडाने मारहाण केल्याची घटना वानलेसवाडी परिसरात घडली. याबाबत प्रमोद ऊर्फ गुंड्या विजय भंडारे (रुक्मिणी, मार्केट यार्ड नजीक, वानलेसवाडी) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

फिर्यादी प्रमोद हा त्यांचा मित्र अमित देवकुळे याच्यासमवेत गप्पा मारत थांबला असता संशयित प्रसाद सदाशिव जैनावर (वय २१, वानलेसवाडी) तेथे आला आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याने वाद घालण्यास प्रारंभ केला. त्या वेळी रस्त्यावर पडलेला दगड घेऊन संशयित प्रसाद याने प्रमोद भंडारे यांच्या डोक्यात मारल्याने तो जखमी झाला. पोलिस अधिक तपास करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.