सांगली मार्केट यार्डसमोरील अपघात; ट्रक चालकास केली अटक
सांगली: येथील सांगली-मिरज रस्त्यावरील मार्केट यार्डसमोरील चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत सायकलस्वार ठार झाले. याप्रकरणी ट्रक चालक सचिन ज्ञानदेव बनसड (३७, रा. बिड) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी काल त्याला अटक केली. या अपघातात श्रीकिशन रामनरेस ठाकूर (वय ४५, देवरिया, उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिस अंमलदार विशाल भिसे यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की श्रीकिशन ठाकूर हे मूळचे उत्तर प्रदेशमधील आहेत. सांगलीत ते सुतारकाम मजूर म्हणून करत होते. चांदणी चौकात ते एका भाड्याच्या घरात एकटेच राहत होते. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ते भाजीपाला खरेदी करून चांदणी चौकाकडे निघाले होते. सांगलीहून मिरजेच्या दिशेने बेदकार व भरधाव निघालेल्या ट्रकने (एमएच १२ एमई ८१७२) जोराची धडक दिली. ठाकूर यांच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. दरम्यान, विश्रामबाग पोलिसांनी तातडीने ट्रक चालकास ताब्यात घेतले. काल रात्री गुन्हा नोंद करून अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिस अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.