Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नोकरी लावण्याच्या बहाण्याने तेरा लाखांची केली फसवणूक..

नोकरी लावण्याच्या बहाण्याने तेरा लाखांची केली फसवणूक..


सांगली:  नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांची तेरा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना २० जून २०२० ते १८ ऑगस्ट २०२० च्या दरम्यान घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी शैलेश विठ्ठल पेटकर (रा. ४०, रा. प्रगती कॉलनी सांगली ) याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी सांगितले की, युसुफ मोहम्मदहुसेन नदाफ (रा. विनायकनगर, वारणाली, सांगली )यांनी फिर्याद दिली. फिर्यादी नदाफ आणि संशयीत पेटकर यांची ओळख होती. त्याचा फायदा घेत पेटकर याने फिर्यादीचा भाऊ खालीद यास नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून फिर्यादी युसूफकडून पाच लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादी नदाफ यांचे मित्र मुजफ्फर याची बहिण निलोफर यांना नोकरीस लावण्याचे आश्‍वासन देऊन त्यांच्याकडून आठ लाख घेतले. मात्र नोकरी न मिळाल्याने दोघांनीही दिलेले पैसे संशयीत शैलेश पेटकर यास परत मागितले. यावेळी त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादी युसुफ नदाफ यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयीत पेटकर याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.