सांगली: गोकुळनगरमधून दोन राजस्थानी मुलींची सुटका..
दोन महिलांसह तिघांवर गुन्हा ; विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली: शहरातील गोकुळनगरमध्ये सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर विश्रामबाग पोलिसांनी छापा टाकून राजस्थानी दोन युवतींची सुटका केली. याप्रकरणी दोन महिलांसह तिघांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
कविता भिराव कट्टीमणी (वय २७, रा. मुद्देबाळ, विजापूर, सद्या रा. गोकुळनगर), जनताबाई गिरीराज तील्लोर (६०, गोकुळनगर, मूळ रा. राजस्थान) अशी त्या दोन महिलांची नावे आहेत. वेश्या व्यवसायासाठी सरंक्षण दिल्याप्रकरणी नितीन ठोकळे (रा. टिंबर एरिया) याच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला. काल दुपारी अडीचच्या सुमारास गोकुळनगरमधील गल्ली क्रमांक दोनमध्ये छापा टाकण्यात आला. पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, की गोकुळनगरमधील दुसऱ्या गल्लीत संशयित जनताबाई तील्लोर कुंटणखाना चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला. त्यावेळी संशयित महिला पीडितांस जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी भाग पडत असल्याचे दिसून आले.
तेवीस वर्षीय युवती चौथका, वरवाड (राजस्थान) येथील, तर दुसरी २१ वर्षीय युवती भवानीपुरा, बनगामाता बुंदी (राजस्थान) येथील युवती सापडल्या. पोलिसांनी त्यांची पोलिसांनी सुटका केली. घराची मालकीन संशयित कविता कट्टीमणी आणि व्यवसायासाठी संरक्षण दिल्याप्रकरणी नितीन ठोकळे याच्यावरही यावेळी गुन्हा नोंद करण्यात आला. गोकुळनगरमधील दुसऱ्या गल्लीत छापा पडल्याने एकच खळबळ उडाली. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक तानाजी कुंभार यांनी फिर्याद दिली. पोलिस अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.