सांगली ते कोल्हापूर रोडवरील भीषण अपघात..
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मृत माधव जोशी हे मुंबईतील शिपयार्डमध्ये एका कंपनीत काम करत होते. निवृत्तीनंतर ते कोल्हापूर रोडवरील रुक्मिणीनगर येथे एकटेच राहत होते. जोशी आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांची मोपेड दुचाकी (एमएच १० डिके ३६४५) वरून सांगलीकडे येत होते. याचवेळी जखमी बसवराज जिनाप्पा कावळे हा त्याच्या दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगात निघाला होता. कोल्हापूर रोडवरील हॉटेल उदय डिलक्स समोर दोनही मोटारसायकलींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात जोशी हे रस्त्यावर जोरात आपटल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. बसवराज कावळे याने हेल्मेट घातल्याने त्याला कोरकोळ मार लागला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.