पालघरमध्ये लाच म्हणून दारूचा खंबा मागणाऱ्या वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
पालघर : पालघर येथे वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. लाच म्हणून त्या दोघांनी दारूची बाटली मागितली होती. या दारुच्या बाटलीची किंमत फक्त 760 रुपये आहे. अवघ्या 760 रुपयांच्या दारुच्या बाटलीमुळे त्या दोघांची नोकरी गेली आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा येथे दारूची बाटली लाच म्हणून घेताना वर्ग तीनच्या दोन वनपालांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पालघर लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. वाडा तालुक्यातील नेहरोळी परिमंडळ आणि बाणगंगा परिमंडळ येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
ठेकेदाराला पंचनाम्याचा ना हरकत दाखला देण्यासाठी त्यांनी दहा हजार रुपये रोख आणि एक खंब्याची लाच मागितली होती. त्यांनतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. विजय लक्ष्मण धुरी आणि विष्णु पोपट सांगळे आरोपी वन पालाची नावे आहेत.
त्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाच्या मॅनेजर कडून जमिनीच्या बिनशेती प्रकरणात वन विभागाच्या ना हरकत दाखला मिळण्याकरीता पंचनामा करण्यासाठी रुपये दहा हजार एक दारूचा खंबा याची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी याची संपूर्ण माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. नंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.