बागेश्वर धाममध्ये चिमुकलीच्या मृत्यूने खळबळ..
बागेश्वर धाममध्ये एका १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी मध्य प्रदेश मानवाधिकार आयोगानं जिल्ह्याचे डीएम एसपी यांच्याकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. लहान मुलीच्या मृत्यू प्रकरणी आयोगानं कलेक्टर आणि छतरपूरचे पोलीस अधिक्षकांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यास सांगितलं गेलं आहे.
राजस्थानच्या बाडमेरमध्ये एका महिला आपल्या मुलीला घेऊन बागेश्वर धाममध्ये आली होती. मीडिया रिपोर्टनुसार बागेश्वर महाराज पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी मुलीला विभुती दिली आणि ती आता शांत झाली असल्याचंही कुटुंबीयांना सांगितलं. तसंच तिला इथून घेऊन जाण्या सांगितलं. पण तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिला सरकारी अॅम्ब्युलन्स देखील मिळू शकली नाही. यानंतर कुटुंबीयांनी खासगी अॅम्ब्युलन्ससाठी ११,५०० रुपये खर्च करुन तिला राजस्थानला नेलं. मृत मुलीचं नाव विष्णु कुमारी असून तिला १७ फेब्रुवारी रोजी बागेश्वर धामला घेऊन जाण्यात आलं होतं. कुटुंबीयांच्या माहितीनुसार तिला मिरगीचे झटके येत असतं. चमत्काराची माहिती ऐकून तिचे कुटुंबीय तिला बागेश्वर धाममध्ये घेऊन गेले होते.
मुलीला मिरगीचा झटका येत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. बागेश्वर धाममध्ये नेलं असता मुलीला रात्रभर झोप लागली नाही, दुपारी डोळे मिचकावले तेव्हा नातेवाईकांना वाटले की मुलगी झोपी गेली आहे. शरीरात कोणतीही हालचाल न झाल्याने त्यांना भीती वाटल्याने त्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेले, तिथं तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आता मध्य प्रदेश मानवाधिकार आयोगाने या संपूर्ण प्रकरणाचा छतरपूर जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून अहवाल मागवला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.