Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जामवाडीत मायलेकास मारहाण..

जामवाडीत मायलेकास मारहाण..



सांगली: फायनान्सच्या पार्श्‍वभूमीवर घराचा फोटो काढल्याच्या कारणावरुन जामवाडीत मायलेकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. संशयीत नेताजी मलकू सूर्यवंशी याने शुभम राजू रोहिटे याच्यावर लोखंडी खोऱ्‍याने हल्ला केल्याने शुभम जखमी झाला आहे. याप्रकरणी वैभव राजू रोहिटे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.

पोलिसांनी सांगितले, की शहरातील जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळ राहणारे रोहिटे यांना त्याच परिसरात राहणारा संशयीत नेताजी सुर्यवंशी याने बोलावून घेतले. फायनान्सच्या निमित्ताने आमच्या घराचे फोटो घेण्यास का सांगितलेस, असा जाब विचारुन शिवीगाळ केली. यावेळी रोहिटे यांच्या आईने मध्यस्थी करुन वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रोहिटे हे पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले. ते गेल्यानंतर संशयीत नेताजी सुर्यवंशी, माधुरी सूर्यवंशी, रेखा सूर्यवंशी, महेश सुतार आदींनी रोहिटे यांच्या आईला शिवीगाळ केली तर भाऊ शुभम याच्यावर तेथे पडलेला लोखंडी खोऱ्‍या घेऊन हल्ला केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयीतांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.