आमदार करण्यासाठी कोश्यारी यांनी पैसे घेतले, जाता जाता कुणी केला हा आरोप ?
नाशिक : राज्यपाल कोश्यारी यांच्यात महाराष्ट्राच्या अस्मिता पुरुषांचा अपमान केल्याचा आरोप झाला. कोश्यारी यांच्याकडील राज्यपाल पद काढून घेण्यात आले आहे. महाराष्ट्र सोडून जाण्याची तयारी सुरु असतानाच आता कोश्यारी यांच्यावर आमदारकीसाठी पैसे घेतल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे. नाशिकमधील उद्योगपती आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते संतोष अशोक नाथ यांनी कोश्यारी हा गंभीर आरोप केला आहे.
राज्यपाल असताना कोश्यारी यांनी आमदार करण्यासाठी आमचे पैसे घेतले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून त्यांनी आमची आमदार म्हणून शिफारस केली होती. त्यानुसार त्यांनी आम्हाला आमदार असे घोषित केलं आहे. ती आमदारकी त्यांनी आम्हाला द्यावी आणि महाराष्ट्र सोडावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.